Child Kidnapping | मुले पळविणा-या महिलेला महिलांकडूनच चोप | Nashik

2021-09-13 16

इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे अज्ञात मतिमंद महिला दोन मुले पळवित असल्याचे गावातील महिला व तरुणांमुळे लक्षात येताच ह्या महिलेला गावक-यांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुरूवारी दुपारनंतर ही घटना इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख या गावात घडली पाडळी देशमुख (इगतपुरी) गावातील पंढरीनाथ वारूंगशे यांचा नातु प्रज्वल अंकुश वारूंगसे(4) व माजी सरपंच जयराम धांडे यांचा मुलगा सवेॅश जयराम धांडे (3) हे खेळत असतांना ह्या महिलेने एकाचा हात तर प्रज्वलला कडेवर घेऊन पोबारा करीत असतांना गावातील काही महिला व तरुणांच्या ही बाब लक्षात येऊन महिलेकडुन मुले ताब्यात घेतली. त्यानंतर या महिलेने येथुन पळ काढला. तीचा गावक-यांनी पाठलाग करून तिची विचारपुस केली असता तीला मराठी व हिंदी भाषा समजत नसल्याने ती परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी संतप्त महिलांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान ही महिला वाडीव-हे पोलिसांच्या ताब्यात असुन सदरची महिला पाडळी (विल्होळी) स्थानकावर कोणत्यातरी रेल्वेगाडीतुन उतरली असावी,ती मतिमंद असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या महिलेचे फोटो सोशल मिडियावर जिल्ह्याभरात गुरूवार सायंकाळ पासुन व्हायरल झाले आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #ChildKidnapping #Nashik

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Free Traffic Exchange